Arbitrary loot of the bank in the name of minimum balance of beloved sister's money. Two-three hundred rupees fall into the hands of the sisters and some get zero rupees. Banks turn a blind eye even to government orders
. सबात टाइम्स न्युज नेटवर्क संपादक : खान नजमुल इस्लाम दिनांक : ३०/०८/२०२४ लाडकी बहिणींच्या पैशांची मिनिमम बॅलेन्स नावाखाली बँकाची मनमानी आर्थिक लुट बहिणींच्या हातात पडतायेत दोन-तीनशे रुपये तर काहींना शुन्य रुपये सरकारच्या आदेशाकडेही बँकांचे डोळेझाक खान नजमुल इस्लाम ------------------------------ नाशिक : सबात टाइम्स न्युज नेटवर्क - 'लाडकी बहिण' योजनेचे पैसे बँक खात्यात जमा पण, बँकांनी खात्यात मिनिमम बॅलेन्स अटीचे भुत पुढे करून विविध शुल्क आकारून लाभार्थी महिलांच्या पैशांची लुट चालवली आहे. तीन हजार रुपये ऐवजी हातात अवघी काही रक्कमच पडत आहे. लाभार्थी महिलांच्या वाढत्या तक्रारीवरून आता राज्य सरकारचे बॅंकांना महत्वाचे आदेश व परिपत्रक जारी करुन लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांच्या मिनिमम बॅलेन्स या अटीमध्ये कापू नये असे आदेश सरकारने बँकांना दिले आहेत. मात्र या आदेशाकडे बँका साफ दुर्लक्ष करत आहेत परिस्थिती जैसे थे आहे. राज्य सरकारतर्फे राबवली जाणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतंर्गत जुलै - ऑगस्ट या महिन्यांच्या तीन हजार रु...