Remembrance of the beloved Prophet Muhammad (S.A.W.) on the occasion of Jashne Eid-e-Miladunnabi Juloos-e-Mohammadiya organized with various religious programs
सबात टाइम्स न्युज नेटवर्क संपादक : खान नजमुल इस्लाम दिनांक : १६/०९/२०२४ जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त प्रिय पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्मरण, विविध धार्मिक कार्यक्रमांसह जुलूस-ए-मोहम्मदियाचे आयोजन खान नजमुल इस्लाम ------------------------------- नाशिक : सबात टाइम्स न्युज नेटवर्क - इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर नबी-ए-करीम हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांची जयंती जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी सोमवारी (दि.१६ सप्टेंबर) विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. पैगंबरांचा जन्म इस्लामी महिना रबिऊल अव्वल मासारंभ होताच मागील बारा दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांव्दारे पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांचे स्मरण करीत त्यांच्यावर दरूद व सलाम अर्पण केले जात आहे. पैगंबर यांची मानवतावादी शिकवण व समानतेचा संदेशाचा प्रचार होत आहे. दरम्यान,सोमवारी जश्ने ईद ए-मिलादुन्नबी निमित्ताने दुपारी शहरातून धार्मिक मिरवणूक जुलूस-ए-मोहम्मदियाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य जुलूस जुने नाशिकच्या ऐतिहासिक जहाँगीर मशिद चौकातू...