Remembrance of the beloved Prophet Muhammad (S.A.W.) on the occasion of Jashne Eid-e-Miladunnabi Juloos-e-Mohammadiya organized with various religious programs
संपादक : खान नजमुल इस्लाम
दिनांक : १६/०९/२०२४
जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त प्रिय पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्मरण, विविध धार्मिक कार्यक्रमांसह जुलूस-ए-मोहम्मदियाचे आयोजन
खान नजमुल इस्लाम
-------------------------------
नाशिक : सबात टाइम्स न्युज नेटवर्क -
इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर नबी-ए-करीम हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांची जयंती जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी सोमवारी (दि.१६ सप्टेंबर) विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. पैगंबरांचा जन्म इस्लामी महिना रबिऊल अव्वल मासारंभ होताच मागील बारा दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांव्दारे पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांचे स्मरण करीत त्यांच्यावर दरूद व सलाम अर्पण केले जात आहे. पैगंबर यांची मानवतावादी शिकवण व समानतेचा संदेशाचा प्रचार होत आहे. दरम्यान,सोमवारी जश्ने ईद ए-मिलादुन्नबी निमित्ताने दुपारी शहरातून धार्मिक मिरवणूक जुलूस-ए-मोहम्मदियाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य जुलूस जुने नाशिकच्या ऐतिहासिक जहाँगीर मशिद चौकातून दुपारी दोनला प्रारंभ होईल. दरम्यान जुलूस -ए-मोहम्मदिया मध्ये डिजे ध्वनीक्षेपक हद्दपार करण्याचा निर्णय मुस्लिम धर्मगुरूंनी घेतला आहे कोणीही जुलूसमध्ये डिजेसह सहभागी होऊ नये इस्लाम धर्मात संगीत वाद्द निषिध आहे तेव्हा डिजे सारखे वाद्द साहित्य जुलूस मध्ये आणता कामा नये असे आवाहन करण्यात आले आहे.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने घरे, दुकाने, प्रमुख रस्ते व चौकात आकर्षक विद्दुत्त रोषणाई व सजावट केली गेली आहे. इस्लामी धार्मिक ध्वज ठिकठिकाणी फडकाविण्यात आले आहे. वाहनांवरही हे ध्वज, इस्लामचा संदेश देणारी स्टिकर्स झळकली आहे. जश्ने ईद-मिलादुन्नबी निमित्त धर्मगुरूंंचे धार्मिक प्रवचन तसेच महिलावर्गाकडुन मिलाद शरीफच्या सामुहिक मजलिस वाचनासह विविध कार्यक्रम होत आहेत.
दरम्यान, जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहरातील विविध भागात सामाजिक संस्थांनी पवित्र काबा व मदिना शरीफचे आकषर्क सजावट असलेले भव्य प्रतिकृति तयार करण्यात आले आहे. नागरीकांनी सजावट व देखावे बघण्यासाठी एकच गर्दी केली. या देख्यावांनी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या उत्सवात आनंद व्दीगणित केले तर जुने नाशिक परीसरातील प्रमुख चौकात रंगबिरंगी कागदी फरारेसह आकषर्क विद्दुत्त रोषणाई करुन ठिकठिकाणी इस्लामी ध्वज फडकाविण्यात आले आहे. जुने नाशिक परीसरातील मुस्लिम बहुल भागात जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीचे सवर्त्र आनंदी वातावरण पसरलेले दिसुन आहे. दरम्यान, पैगंबर जयंतीच्या धार्मिक कायर्क्रम व जुलूस शांततेत व सुरळीत पार पडावे यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारीचे उपाययोजना करत अतिरिक्त पोलिस बळ मागवित अतिसंवेदनशील भागात ते बंदोबस्त तैनात करुन वाढीव पोलिस बंदोबस्तासह पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेसह ड्रोन कॅमेरेने कडक नजर पोलिसांची असणार आहे हे विशेष.
0000000000000000000000
Comments
Post a Comment