In Nashik Central Vidhan Sabha Constituency, Shiv Sena (UBT) faction suffered a big blow.
सबात टाइम्स न्युज नेटवर्क संपादक : खान नजमुल इस्लाम दिनांक : २४/१०/२०२४ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का उबाठाचाच तगडा मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार खान नजमुल इस्लाम --------------------------- नाशिक : (सबात टाइम्स न्युज नेटवर्क) - लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरभरून मतदान करणाऱ्या मुस्लिम समाजास विधानसभा निवडणुकीत डावल्याने समाजात नाराजीचा सुर दिसुन येत आहे. मुस्लिम समाजास देखील प्रतिनिधित्व मिळायला हवा केवळ मुस्लिमांचा राजकीय वापर नको मतदान हवं उमेदवार का नको अशी भावना व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये एकही मुस्लिम उमेदवाराला स्थान मिळालेले नाही. नाशिक मध्य विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटला आहे. महाविकास आघाडी कडुन अनेक मुस्लिम उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. उबाठाच्या शिवसेनाने माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार न दिला गेल्याने उध्दव ठाकरे गटाचाच एक तगडा मुस्लिम उमेद...