In Nashik Central Vidhan Sabha Constituency, Shiv Sena (UBT) faction suffered a big blow.
संपादक : खान नजमुल इस्लाम
दिनांक : २४/१०/२०२४
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का उबाठाचाच तगडा मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
खान नजमुल इस्लाम
---------------------------
नाशिक : (सबात टाइम्स न्युज नेटवर्क) - लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरभरून मतदान करणाऱ्या मुस्लिम समाजास विधानसभा निवडणुकीत डावल्याने समाजात नाराजीचा सुर दिसुन येत आहे. मुस्लिम समाजास देखील प्रतिनिधित्व मिळायला हवा केवळ मुस्लिमांचा राजकीय वापर नको मतदान हवं उमेदवार का नको अशी भावना व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये एकही मुस्लिम उमेदवाराला स्थान मिळालेले नाही.
नाशिक मध्य विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटला आहे. महाविकास आघाडी कडुन अनेक मुस्लिम उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. उबाठाच्या शिवसेनाने माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार न दिला गेल्याने उध्दव ठाकरे गटाचाच एक तगडा मुस्लिम उमेदवार माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनीे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या उमेदवारीने खळबळ उडाली आहे। महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात मुस्लिम मतदार संख्या लक्षणीय आहे. मुस्लिमांचा एकगठ्ठा मतदान निकाल फिरवू शकतो हे लोकसभेच्या निवडणुकीत दिसुन आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, मालेगाव मध्य, येवला, असे काही विधानसभेचे मतदार संघ आहेत.ज्यात इतर जातीच्या मतदारांच्या मतांची साथीने येथून मुस्लिम उमेदवार निवडून येवु शकतो. मात्र राजकीय पक्ष मुस्लिम उमेदवारास उमेदवारी देत नाहीत. केवळ मुस्लिमांचा एकगठ्ठा मतदान पारड्यात पाडुन घेतात. यंदाच्या निवडणुकीत काही मुस्लिमांना उमेदवारी देण्याचा विचार आहे अशी वल्गना उध्दव ठाकरे,संजय राऊत यांनी केली होती. मात्र ती फोल ठरली. उबाठा शिवसेना कडुन एकही मुस्लिम उमेदवार देण्यात आलेला नाही. या उलट महायुतीत
सामिल झालेलेे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आपल्या कोट्यातील काही जागा मुस्लिम समाजातील उमेदवारांना देण्याचे छातीठोकपणे सांगुन आपण लाचार नसल्याचे दाखवून दिले. त्याच बरोबर मुस्लिमांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नितेश राणे यांना देखील ठणकावले होते व भाजपचे अमित शाह यांच्याकडे नितेश राणें विरोधात तक्रार देखील केली होती हे विशेष महायुतीत असुन ही अजित पवार यांनी जे धाडस दाखविले ते धाडस महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार व काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या व्होट बँक असलेल्या मुस्लिम समाजाविषयी आवाज उठविण्याचा धाडस करता आले नाही.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात तगडा मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उतरल्यास व मुस्लिम मतदारांचा एकगठ्ठा मतदान या उमेदवाराच्या पारड्यात पडले तर निकाल देखील फिरू शकतो असे जाणकरांचे मत आहे.
000000000000000000000
Comments
Post a Comment