Shaikh Shakir Abdul Shakur received the Maharashtra State Urdu Academy's State Level Ideal Teacher Award.
सबात टाइम्स न्युज नेटवर्क मुख्य संपादक : खान नजमुल इस्लाम दिनांक : २८/०९/२०२५ शेख शाकीर अब्दुल शकुर यांना महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार खान नजमुल इस्लाम ---------------------------- मालेगाव: (सबात टाइम्स न्युज नेटवर्क) - उर्दू भाषेचे प्रख्यात भाषा तज्ञ आणि शिक्षणतज्ञ शेख शाकीर अब्दुल शाकीर यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीने वर्ष २०२३ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. मालेगावच्या शिक्षण क्षेत्रातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे शेख शाकीर अबदुल शकुर महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमी दरवर्षी उर्दु भाषा,शिक्षण आणि साहित्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध पुरस्कार आणि सन्मान देते. यावर्षी देखील,अकादमीने २०२१, २०२२ आणि २०२३ साठी पुरस्कारांची घोषणा केली. दरवर्षी हे पुरस्कार उर्दू भाषा आणि साहित्य, पत्रकारिता आणि अध्यापन क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या किंवा नवीन सर्जनशील क्षमता प्रदर्शित करणाऱ्यांना दिले जातात....