Eid-e-Miladunnabi and Teachers' Day celebrated with enthusiasm at Khairul Banaat English Medium School
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
मुख्य संपादक : खान नजमुल इस्लाम
दिनांक : ०५/०९/२०२५
खैरूल बनात इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी व शिक्षक दिन उत्साहात साजरा
खान नजमुल इस्लाम
---------------------------
नाशिक : (सबात टाइम्स न्युज नेटवर्क) - येथील सुप्रसिद्ध खैरूल बनात इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी, शिक्षक दिन व संस्थेचे संस्थापक हाजी अलाउद्दिन मोहम्मद जिया यांची बरसी संयुक्तपणे विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची सुरवात हम्द व किरत पठणाने झाली.विद्दार्थिनींनी नात-ए-पाक चे वाचन केले. पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांचे धार्मिक महत्त्व विशद करणारे हदीस व धार्मिक प्रवचन झाले.दरुद व सलाम पेश करून पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांचे विविध धार्मिक कार्यक्रमव्दारे स्मरण करण्यात आले.
याप्रसंगी दर्सगाह-ए-खैरूल बनात अलसुन्निया संस्थेचे संस्थापक हाजी अलाउद्दीन मोहम्मद जिया (रहे.) यांची बरसी फातेहा वाचन करत धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
शिक्षक दिनानिमित्त शिक्षक दिन ही यावेळी साजरा करण्यात आला. शिक्षक व विद्यार्थिनींनी शिक्षक दिनाचे म्हत्व विशद करत शिक्षकांचे शिक्षण व ज्ञानदानाचे कार्य गौरवशाली असल्याचे गौरवपर भाषणे झाली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या शिक्षिकांना गौरविण्यात येवुन भेटवस्तू प्रदान करण्यात आले.
जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने शाळेतर्फे उपस्थितांना नियाजचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शेख खालिद हुसैन, मुश्ताक खतीब, पठाण सर, डॉ तांबोळी, फिरोज पठाण, नदीम सर, सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका खान आशना तेहसीन व आसमा शेख यांनी केले.
कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका खान रूमैशा फरहीन,मुख्याध्यापिका तहेसीन शेख व शिक्षिकांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
०००००००००००००००००००००
Comments
Post a Comment