On the occasion of Eid-e-Miladunnabi, the remembrance of the beloved Prophet Hazrat Muhammad (PBUH), various religious programs and processions are held in great religious fervor.
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
संपादक : खान नजमुल इस्लाम
दिनांक : ०५/०९/२०२५
जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त प्रिय पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांचे स्मरण, विविध धार्मिक कार्यक्रमांसह जुलूस-ए-मोहम्मदिया अमाप धार्मिक उत्साहात
खान नजमुल इस्लाम
-------------------------------
नाशिक : (सबात टाइम्स न्युज नेटवर्क) -
इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर नबी-ए-करीम हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांची १५०० वी जयंती जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी शुक्रवारी (दि.०५ सप्टेंबर) विविध धार्मिक कार्यक्रमांनी अमाप धार्मिक उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जुलूस-ए-मोहम्मदीया मुख्य जुलुस जुने नाशिकच्या एतिहासिक जहाँगीर मस्जिद चौकातून काढण्यात आला.जुलुसचे नेतृत्व खतिब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतिब यांच्यासह मुस्लिम धर्मगुरू उलेमांनी केले.संततधार भर पावसात जुलूस लब्बैक या रसुलअल्लाह, नार-ए-तकबीर अल्लाहु अकबर अशा धार्मिक घोषणा देत मिलाद शरीफ व नात-ए-पाक चे पठण करत पारंपरिक मार्गाने जुलुस पुढे जात बडी दरगाह शरीफ येथे पोहचला.
जुलुस मध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.जुलुसच्या मार्गावर आकर्षक विद्दुत रोषणाई,भव्य कमानी व आकर्षक सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी पवित्र मक्का-मदिना च्या भव्य प्रतिकृतीचे देखावे साकारण्यात आले होते हे आकर्षक देखावे बघण्यासाठी ईद-ए-मिलादच्या पुर्वसंध्येवर आबालवृद्धांनी गर्दी केली.
पैगंबरांचा जन्म इस्लामी महिना रबिऊल अव्वल मासारंभ होताच मागील बारा दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. या धार्मिक कार्यक्रमांव्दारे पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांचे स्मरण करीत त्यांच्यावर दरूद व सलाम अर्पण केले गेले. या निमित्ताने पैगंबर यांची मानवतावादी शिकवण व समानतेचा संदेशाचा प्रचार पसार करण्यात आला.
जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने घरे, दुकाने, प्रमुख रस्ते व चौकात आकर्षक विद्दुत्त रोषणाई व सजावट करण्यात ग आली होती. इस्लामी धार्मिक ध्वज ठिकठिकाणी फडकाविण्यात आले होते.वाहनांवरही हे इस्लामी ध्वज, व इस्लामचा संदेश देणारी स्टिकर्स झळकली. जश्ने ईद-मिलादुन्नबी निमित्त शधर्मगुरूंंचे धार्मिक प्रवचन तसेच महिलावर्गाकडुन मिलाद शरीफच्या सामुहिक मजलिस वाचनासह विविध कार्यक्रम झालेत.
दरम्यान, जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहरातील विविध भागात मुस्लिम सामाजिक संस्थांनी विविध मिठाई, फळे,केक गोड बिस्किटे, गोड खीर आदींचे मोठ्या प्रमाणात वाटप केले.
१५०० वी ईद-ए-मिलाद व ती शुक्रवारी आल्याने मुस्लिम बांधवात अमाप धार्मिक उत्साह होता. ईदचा आनंद द्विगुणित झाला.दरम्यान,जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलुस मध्ये इतर धर्मियांनी हजेरी लावत राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शन घडविले.
दरम्यान, पैगंबर जयंतीच्या धार्मिक कायर्क्रम व जुलूस शांततेत व सुरळीत पार पडले. यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारीचे उपाययोजना करत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व त्यांचे सहकारी वरीष्ठ पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जुलुस व इतर धार्मिक कार्यक्रम सुरळीतपणे शांततेत पार पडले.
0000000000000000000000
Comments
Post a Comment