Posts

Showing posts from July, 2024

Controversial IAS officer Pooja Khedkar's candidature canceled by UPSC

Image
सबात टाइम्स न्युज नेटवर्क संपादक : खान नजमुल इस्लाम दि.३१/०७/२०२४ वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारीच  यूपीएससीकडून रद्द  सबात टाइम्स न्युज नेटवर्क ------------------------------------ वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना  यूपीएससीने मोठा धक्का दिला आहे. यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. तसेच यूपीएससीने पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीमधून काढून टाकले आहे.  यूपीएससीने उमेदवारी रद्द करण्याबरोबरच पूजा खेडकर यांना आता यापुढे यूपीएससी परीक्षा देखील देता येणार नाही. खेडकर यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का  मानला  जात आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा   पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना यूपीएससीकडून दोषीकरार देण्यात आला आहे. नागरी सेवा परीक्षा नियम २०२२ नुसार दोषी ठरवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्या बाजूने आज न्यायालयात युक्तिवाद करण्य...

Anti-gang squad arrests absconding accused who opened fire with intent to kill for non-payment of extortion money

Image
सबात टाइम्स न्युज नेटवर्क संपादक : खान नजमुल इस्लाम दि.२६/०७/२०२४ खंडणीचे पैसे न दिल्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणाऱ्या फरार आरोपीतास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद सबात टाइम्स न्युज नेटवर्क -------------------------- नाशिक :  फिर्यादी ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांना चाडेगाव येथील हॉटेल मध्ये रात्रीच्या वेळेस आरोपी सचिन मानकर व त्याचे साथीदारांनी मिळुन फिर्यादी ज्ञानेश्वर मानकर यांचेकडे जबरदस्तीने २०,०००/- रुपये खंडणी स्वरुपात मागितले असता फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी सचिन मानकर याने फिर्यादी यांना मारहाण करुन तुला आता ठार करतो असे सांगुन त्याचे कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढुन दोन वेळा फिर्यादी यांच्या दिशेने गोळीबार केला असता त्यापैकी एक गोळी फिर्यादी यांचे पाठीमध्ये लागली म्हणुन दिनांक २५/०४/२०२४ रोजी नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३८/२०२४ भादंविक ३०७, ३८७, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अक्ट ३/२५ सह मपोकाक १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,...

Registration of six and a half lakh women in the district so far under Majhi Ladki Bahin Yojana

Image
सबात टाइम्स न्युज नेटवर्क  संपादक : खान नजमुल इस्लाम दि.२५/०७/२०२४ मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाख महिलांची नोंदणी आता नवीन पध्दतीने अर्जांचा निपटारा                                          सबात टाइम्स न्युज नेटवर्क ----------------------------------- नाशिक : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ६७ हजार ७४ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये ३ लाख ६९ हजार ६९६ महिलांनी ऑफलाईन तर २ लाख ८७ हजार ३७८ महिलांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नागरी अंगणवाडी, ग्रामीण क्षेत्र अशी मिळून आहे. प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली  आहे. महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्रात ७३ हजार ४३७, नागरी अंगणवाडी क्षेत्रात ५७ हजार ३४३ आणि ग्र...

Hanif Basheer aspirant for Nashik Central Assembly submits candidature application to Congress State President Nana Patole

Image
सबात टाइम्स न्युज नेटवर्क संपादक : खान नजमुल इस्लाम दि. २०/०७/२०२४ नाशिक मध्य विधानसभासाठी हनिफ बशीर इच्छुक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे उमेदवारी मागणी अर्ज सुपूर्द खान नजमुल इस्लाम नाशिक : (सबात टाइम्स न्युज नेटवर्क) नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नाशिक शहर जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनिफ बशीर शेख  यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मान्यवरांच्या उपस्थितीत भेट घेत आपला उमेदवारी  मागणी अर्ज सादर केला.  अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम करीत आहेत. मतदार संघात पक्षासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे.कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. सर्व जाती धर्मांच्या लोकांत मोठे जनसंपर्क व कार्याच्या बळावर  मी पक्षाकडे उमेदवारी मागितली असे हनिफ बशीर यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष माजी आमदार वजाहत मिर्झा, माजी आमदार एम. एम.शेख, मुंबई अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष हाजी इब्राहिम भाई  नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, दाऊद शेख, समीना पठ...