Registration of six and a half lakh women in the district so far under Majhi Ladki Bahin Yojana
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
संपादक : खान नजमुल इस्लाम
दि.२५/०७/२०२४
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाख महिलांची नोंदणी आता नवीन पध्दतीने अर्जांचा निपटारा
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
-----------------------------------
नाशिक : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ६७ हजार ७४ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये ३ लाख ६९ हजार ६९६ महिलांनी ऑफलाईन तर २ लाख ८७ हजार ३७८ महिलांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नागरी अंगणवाडी, ग्रामीण क्षेत्र अशी मिळून आहे. प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्रात ७३ हजार ४३७, नागरी अंगणवाडी क्षेत्रात ५७ हजार ३४३ आणि ग्रामीण भागात ५ लाख, २६ हजार २९४ असे एकूण ६ लाख ५७ हजार ७४ अर्ज प्राप्त आहेत. नगरपालिका, नागरी अंगणवाडी, ग्रामीण क्षेत्रातील महिलांची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २९ लाख ४४ हजार ७९१ असून या संख्येच्या प्रमाणात ६ लाख ५७ हजार ७४ अर्ज प्राप्त आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण उभारण्यात आलेल्या मदत कक्षांची संख्या ५ हजार ७९७ इतकी आहे.
राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांचा नोंदणीसाठी प्रतिसाद दिसून येत आहे.
ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबविण्यावर सरकारचा भर असून शासनस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सविचांना घेऊन समिती नेमण्यात आली आहे. आता, या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी, योजना प्रभावी व सुलभतेने राबविण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर काही बदल केले आहेत. त्यासंदर्भात, आजच महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये, आता विधानसभा क्षेत्रनिहाय समिती नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे, विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिंनींच्या अडचणींचा निपटारा होणार असून 3 अशासकीय सदस्यांचाही या समितीत समावेश केला जाणार आहे.
००००००००००००००००००००००
Comments
Post a Comment