Anti-gang squad arrests absconding accused who opened fire with intent to kill for non-payment of extortion money
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
संपादक : खान नजमुल इस्लाम
दि.२६/०७/२०२४
खंडणीचे पैसे न दिल्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणाऱ्या फरार आरोपीतास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
--------------------------
नाशिक : फिर्यादी ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांना चाडेगाव येथील हॉटेल मध्ये रात्रीच्या वेळेस आरोपी सचिन मानकर व त्याचे साथीदारांनी मिळुन फिर्यादी ज्ञानेश्वर मानकर यांचेकडे जबरदस्तीने २०,०००/- रुपये खंडणी स्वरुपात मागितले असता फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी सचिन मानकर याने फिर्यादी यांना मारहाण करुन तुला आता ठार करतो असे सांगुन त्याचे कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढुन दोन वेळा फिर्यादी यांच्या दिशेने गोळीबार केला असता त्यापैकी एक गोळी फिर्यादी यांचे पाठीमध्ये लागली म्हणुन दिनांक २५/०४/२०२४ रोजी नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३८/२०२४ भादंविक ३०७, ३८७, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अक्ट ३/२५ सह मपोकाक १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत केले होते त्यानुसार प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), संदीप मिटके, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुंडा विरोधी पथकास सुचना देवुन मार्गदर्शन केले.
सदर गुन्हयातील आरोपी सचिन मानकर हा पाथर्डी गाव परिसरात असल्याबाबत गुंडा विरोधी पथकाला माहिती मिळाली असता सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सपोनि ज्ञानेश्वर मोहिते यांना देवुन पोउनि मलंग गुंजाळ पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, प्रविण चव्हाण, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत असे पथक तयार करुन आरोपीताचा शोध घेणेकामी रवाना केले. गुंडा विरोधी पथकाने आरोपी सचिन मानकर यास पकडण्यासाठी पाथर्डी गाव परिसरात सापळा लावला असता आरोपीताचा हॉटेल वालदेवी जवळ, पाथर्डी गाव, नाशिक येथे पाठलाग करुन आरोपी सचिन आनंदा मानकर वय-३९ वर्षे, रा. चाडेगाव, मानकर मळा, सामनगाव रोड, नाशिक यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपासकामी नाशिकरोड पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस उप निरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, प्रविण चव्हाण, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, डी. के. पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, नितीन गौतम, निवृत्ती माळी यांनी संयुक्तरित्या बजावली.
०००००००००००००००००००००
Comments
Post a Comment