Controversial IAS officer Pooja Khedkar's candidature canceled by UPSC
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
संपादक : खान नजमुल इस्लाम
दि.३१/०७/२०२४
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारीच यूपीएससीकडून रद्द
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
------------------------------------
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना यूपीएससीने मोठा धक्का दिला आहे. यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. तसेच यूपीएससीने पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीमधून काढून टाकले आहे.
यूपीएससीने उमेदवारी रद्द करण्याबरोबरच
पूजा खेडकर यांना आता यापुढे यूपीएससी परीक्षा देखील देता येणार नाही. खेडकर यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना यूपीएससीकडून दोषीकरार देण्यात आला आहे. नागरी सेवा परीक्षा नियम २०२२ नुसार दोषी ठरवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्या बाजूने आज न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला होता की, अजून यूपीएससीने दोषी ठरवलेले नाही. यूपीएससीकडून आज दुपारपर्यंत पूजा खेडकर यांना त्यांचे म्हणणं मांडायला वेळ देण्यात आला होता. अखेर यूपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर कडक कारवाई केली आहे.
०००००००००००००००००००००
Comments
Post a Comment