Nashik's Hazrat Satpeer Sayyad Baba Dargah demolition case. Hearing in the Supreme Court today. Hon'ble च Mumbai High Court and Nashik Municipal Corporation What will be disclosed ? All eyes are on the order of the Supreme Court
नाशिकच्या सातपीर सय्यद बाबा दरगाह पाडकाम प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी., मा.मुंबई उच्च न्यायालय व नाशिक महानगरपालिका काय खुलासा करणार ? सर्वोच्च न्यायालयाचा काय आदेश येतो याकडे सर्वांच्या नजरा
खान नजमुल इस्लाम
-----------------------------
नाशिक : (सबात टाइम्स न्युज नेटवर्क)- नाशिक महानगरपालिकेची अतिजलद 'कार्यतत्परतेमुळे हजरत सातपीर सय्यद बाबा दरगाहचे नामोनिशाणही उरले नाही.महापालिकेने हि अतिक्रमण मोहीम घाईघाईने का राबविली आणि ज्या मा. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेशाचा आधार घेत दरगाहचे पाडकाम करण्यात आले. त्या मा.मुंबई उच्च न्यायालयसह नाशिक महानगरपालिकेला आज २१ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणीत आपआपले खुलासे सादर करावे लागणार आहे. सुनावणीत काय घडते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कोणाच्या दबावाखाली दरगाह जमीनदोस्त करण्यात आली.इतके काय अत्यावश्यक होते की लगेच तातडीने अतिक्रमणाची कारवाई करण्याची गरज येवून ठेपली होती. वक्फ ट्रिब्युनल कडे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना व मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे काही एक म्हणने ऐकून न घेता दिलेला निकालाला आधार बनवित नाशिक महानगरपालिकेने प्रचंड पोलिस बंदोबस्तात मध्यरात्री दरगाहला जमीनदोस्त करण्याची घाई का केली. अशा विविध प्रश्नांची सरबत्ती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान होण्याची शक्यता आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अतिजलद 'कार्यतत्परतेमुळे' या जागेवर आता हजरत सातपीर सय्यद बाबा दरगाहचे नामोनिशाणही उरलेले नाही व जागा पूर्णपणे मैदानासारखी मोकळी झाली आहे. नाशिक महानगरपालिकेने दरगाह जमीनदोस्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली मात्र तत्पूर्वी नाशिक महानगरपालिकेने दरगाह जमीनदोस्त करण्याची मोहीम फत्ते केली होती.
दरम्यान, संतप्त जमावाने दगडफेक केली. यात काही पोलिस जखमी झाले.पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडत व लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही जणांना पोलिसांनी अटक करून विविध कलमाखाली गुन्हे नोंदविले.दरम्यान, बुधवारी १६ एप्रिल रोजी सुनवणी पार पडली, सुनावणी दरम्यान मा.सर्वोच्च न्यायालयाने मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. याचिकाकर्त्यांचे म्हणने का ऐकुन घेण्यात आले नाही.याचिकेवर तातडीने सुनावणी का केली नाही, असा सवाल उपस्थित करत नाशिक महानगरपालिकेची नोटीसला स्थगिती दिली. व मा.उच्च न्यायालयाने आपला खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुनवणी होण्या आधीच दरगाहचे बांधकाम नाशिक महापालिकेने प्रचंड पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केले.सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,
0000000000000000000000
Comments
Post a Comment