Shaikh Shakir Abdul Shakur was awarded the State Level Ideal Teacher Award by the State Urdu Academy, honored and felicitated by dignitaries.
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
संपादक : खान नजमुल इस्लाम
दिनांक : ०८/१०/२०२५
शेख शाकीर अब्दुल शकुर यांना राज्य उर्दू अकादमीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.,मान्यवरांच्या हस्ते गौरव व सत्कार
खान नजमुल इस्लाम
--------------------------
मुंबई : (सबात टाइम्स न्युज नेटवर्क)- मालेगावचे उर्दू भाषेचे प्रख्यात भाषा व शिक्षणतज्ञ शेख शाकीर अब्दुल शकुर यांना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य समारंभात राज्याचे महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूपेश जोशी (IAS) आणि अल्पसंख्याक विभागाच्या आयुक्त श्रीमती प्रतिमा इंगळे (IAS) यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले याप्रसंगी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे,महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीचे डॉ. शोएब हाश्मी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमी दरवर्षी उर्दु भाषा,शिक्षण आणि साहित्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध पुरस्कार आणि सन्मान देते.
मालेगावच्या शिक्षण क्षेत्रातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे शेख शाकीर अब्दुल शकुर हे मालेगाव शहराचेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व्यक्तिमत्व शेख शाकीर अब्दुल शकुर यांचे नाव शालेय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या यादीत निवडण्यात आले होते.
शेख शाकीर अब्दुल शकुर हे प्री-प्रायमरी अँड प्रायमरी स्कूल (मालदा) अब्दुल शकूर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मिल्लत उर्दू हायस्कूल, इन्शा पॅरामेडिकल अँड स्किल डेव्हलपमेंट कॉलेज या शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष व तहेजीब प्री-प्रायमरी अँड प्रायमरी स्कूलचे ते मुख्याध्यापक आहे. गेल्या २७ वर्षांपासून ते तहेजीब पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. शाकीर शेख यांनी आपल्या कठोर परिश्रम, समर्पण, आवड, इच्छाशक्ती आणि उच्च धैर्याने शाळा विकसित केली.शाळा ही मालेगावची पहिली डिजिटल शाळा बनली आहे.
शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्य व योगदानाने केवळ उर्दू भाषेतील शिक्षणाच्या समृद्ध केले नाही तर त्यांनी भाषाविज्ञानाच्या क्षेत्रातही नवी दिशा दिली आहे त्यांच्या शालेय जीवनाशी संबंधित या सेवांच्या आधारे, त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे अशा गौरवपर शब्दात मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या या पुरस्कार बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
०००००००००००००००००००००
Comments
Post a Comment