The fate of 4136 candidates from 288 assembly constituencies in the state will be locked in the EVM in today's polls. Candidates in husband-wife, father-daughter, uncle-nephew relationships will face each other in contests.
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
संपादक : खान नजमुल इस्लाम
दि.२०/११/२०२४
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील ४१३६ उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतदानात होणार ईव्हीएम मध्ये बंद., पती-पत्नी, वडील-मुलगी, काका-पुतण्या,सख्खे-भाऊ नात्यातील उमेदवार आमनेसामने
खान नजमुल इस्लाम
-----------------------------
सबात टाइम्स न्युज नेटवर्क : - महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात आज बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण ४१३६ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान होणार असून ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदानाची वेळ असेल.
राज्यातील ९.७ कोटी मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी राज्यातील १ लाख ४२७ मतदान केंद्र सज्ज झाली आहेत.
गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला असून सत्तेच्या चाव्या आपल्याकडेच राहाव्यात यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. तर लोकसभेच्या निकालानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने सत्ता परत मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. इतर छोटे पक्ष,अपक्ष व बंडखोरही नशीब आजमावून पाहत आहे.
यंदाच्या निवडणुकीत पती-पत्नी, वडील मुलगी, सख्खे भाऊ, काका-पुतण्या अशा अनेक नात्यातील उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. या रंगतदार लढती लक्षवेधी ठरत आहे. या लक्षवेधी लढतीत कोण बाजी मारतो हे २३ तारखेला मतमोजणीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
२०२४ च्या निवडणुकीत विकासाचे मुद्दे बाजुला पडलेत व जाती धर्माच्या नावावर मतांचे ध्रुवीकरण करण्याचे विशेष प्रयत्न झालेत.
"बटेंगे तो कटेंगे", "एक है तो सेफ है" "व्होट जिहाद", "मतांचा धर्मयुद्ध","फतवा विरुद्ध भगवा" आदींसह अनेक सांप्रदायिक घोषणांचा पाऊस पडला.यामुळे राज्यातील मुळ प्रश्नमागे पडलेत. व महागाई,बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सर्व बाबी बाजुला सारले गेले हे विशेष.
राज्यातील मतदार सुज्ञ आहे तो कोणाच्या बाजुने कौल देतो याची स्पष्टता निकालातून दिसेल.
प्रदेशनिहाय जागा पुढीलप्रमाणे असुन सर्वाधिक जागा या
पश्चिम महाराष्ट्रात आहे ७० जागा त्याखालोखाल विदर्भ - ६२ मराठवाडा - ४६ कोकण ठाणे - ३९
मुंबई - ३६ उत्तर महाराष्ट्र - ३५
२०१९ च्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
महायुती – १६२
महाआघाडी - (१०५)
भाजप (१०५), शिवसेना (५६), रासप (०१), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
राष्ट्रवादी (५४), काँग्रेस (४४), बहुजन विकास आघाडी (०३), शेकाप (०१), स्वाभिमानी (०१)
समाजवादी (०२)
प्रहार जनशक्ती – (०२)
एमआयएम - (०२)
मनसे - (०१)
माकप - (०१)
जनसुराज्य शक्ती – (०१) क्रांतिकारी शेतकरी पक्ष - (०१)
व अपक्ष - (१३) असे पक्षीय बलाबल २०१९ च्या निवडणुकीत होते.
महायुती व महाविकास आघाडीत मुख्य लढत असुन काँटे की टक्करच्या लढतीत महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारते व जनता कोणाला कौल देवुन सत्तेत बसवते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणी नंतर चित्र स्पष्ट होईल. व नवे सरकार राज्याला मिळेल.
०००००००००००००००००००००
Comments
Post a Comment