Tipu Raza of Nashik to prevent the injustice and oppression of the Muslim community in the state meet Governor C.P. Radhakrishnan detailed discussion with the Governor.

सबात टाइम्स न्युज नेटवर्क
संपादक :  खान नजमुल इस्लाम
दिनांक : ३०/१२/२०२४

राज्यातील मुस्लिम समाजावर होत असलेले अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी नाशिकचे  टिपू रझा यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात  भेट घेत दिले निवेदन,  राज्यपालांशी सविस्तर चर्चा

खान नजमुल इस्लाम
------------------------------
  नाशिक :  (सबात टाइम्स न्युज नेटवर्क) - राज्यातील मुस्लिम समाजावर वारंवार होत असलेले अत्याचार व अन्याय  त्वरित रोखण्यासाठी  नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते टिपू रझा यांनी राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवनात भेट घेत मागणीचे निवेदन दिले. यासंदर्भात राजयपालांशी  सविस्तर चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात मुस्लिम समाजावर मोठया प्रमाणावर अत्याचार होत आहे. यामध्ये कल्याण येथे रेल्वे मध्ये एका मुस्लिम समाजातील एका वयोवृद्ध  व्यक्तीस मारहाण करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे विशालगड येथे अतिक्रमणाचे नावाखाली मुस्लिम समुदायास लक्ष करुन मशिदीवर हल्ला करणे, मुस्लिम समाजाची घरे जाळण्यात आली.तसेच नाशिक शहरात देखील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या बडी दरगाह येथे काही दिवसांपुर्वी काही गुंड लोकांनी दरगाह ठिकाणी  सामाजिक तेढ करणाऱ्या  घोषणा देवून जातीयवाद निर्माण करुन मुस्लिम समाजाच्या  धार्मिक भावना दुखावण्याचे काम केले आहे. जेणे करुन शहरात  जातीय दंगल होईल व जातीय तेढ निर्माण होवून शहरातील शांतता भंग करण्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे कृत्य झाले .आहे. नाशिक हे शांतता नांदणारे शहर असून काही समाजविरोधी लोक असे कृत्य करुन शांतता धोक्यात आणण्याचे काम करीत आहे. याबाबत नाशिक शहर गोपनीय विभाग, पोलीसांना हे कृत्य कोणी केले हे सर्व माहिती आहे. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तरी आपण याप्रकरणी जातीने लक्ष देवुन या मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्याय व अत्याचार  रोखण्यासाठी योग्य ती  कारवाई करावी व मुस्लिम समाजास न्याय देण्यात यावा. टिपु रझा, वसीम अनिस शेख, फिरोज गफ्फार शेख आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
०००००००००००००००००००००

Comments

Popular posts from this blog

Nashik's Hazrat Satpeer Sayyad Baba Dargah demolition case. Hearing in the Supreme Court today. Hon'ble च Mumbai High Court and Nashik Municipal Corporation What will be disclosed ? All eyes are on the order of the Supreme Court

Shaikh Shakir Abdul Shakur was awarded the State Level Ideal Teacher Award by the State Urdu Academy, honored and felicitated by dignitaries.

On the occasion of Eid-e-Miladunnabi, the remembrance of the beloved Prophet Hazrat Muhammad (PBUH), various religious programs and processions are held in great religious fervor.